जाणून घ्या 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो

सध्या कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर आहे आणि या साठी काम करणाऱ्या एक संस्थेचे नाव वारंवार आपल्या कानावर पडते ते म्हणजे डब्ल्यू एच ओ (WHO) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना .आणि या संस्थेचा स्थापना दिवस आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो
जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.सर्वांनाच उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे हे या संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे.

जागतिक आरोग्य संघटना किंवा डब्ल्यूएचओ (WHO)संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग आहे.याचे मुख्य कार्य जगभरातील आरोग्याच्या समस्येचे परीक्षण करणे आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करणे आहे. डब्ल्यूएचओची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. डब्ल्यूएचओच्या स्थापनेच्या वेळी, तिच्या घटनेवर 61 देशांनी सही केली होती. 24 जुलै 1948 रोजी त्याची पहिली बैठक झाली.

प्रारंभापासून डब्ल्यूएचओने लहान मोठे आजार निर्मूलनात मोठी भूमिका बजावली आहे. सध्या डब्ल्यूएचओ कोरोना बरोबर एड्स, इबोला आणि टीबी यासारख्या धोकादायक आजारापासून बचाव करण्याचे काम करीत आहे. जागतिक आरोग्य अहवालासाठी डब्ल्यूएचओ (WHO) महत्वाची कामगिरी बजावते, ज्यात संपूर्ण जगाशी संबंधित आरोग्याच्या समस्येचे सर्वेक्षण केले जाते.

डब्ल्यूएचओचे सध्याचे महासंचालक ट्रॅड्रॉस एडोनम आहेत, ज्यांनी 1 जुलै 2017 रोजी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळ सुरू केला आहे.सध्या WHO चे 194 देश सदस्य आहेत आणि जवळपास 150 देशांमध्ये कार्यालय आहे या बरोबरच WHO ची 6 क्षेत्रीय कार्यालये देखील आहेत .
WHO चे उद्देश आणि कार्य

आंतरराष्ट्रीय आरोग्याशी संबंधित कार्ये करण्यासाठी एक दिशानिर्देश व समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करणे.
संयुक्त राष्ट्रसंघासह विशेष संस्था, सरकारी आरोग्य प्रशासन, व्यावसायिक गट आणि आरोग्याच्या क्षेत्रातील लीडर असलेल्या इतर संघटनांना प्रभावी सहकार्य करणे आणि त्यांचे संरक्षण करणे.
सरकारच्या विनंतीनुसार आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहाय्य पुरविणे. आरोग्य आणि प्रगती क्षेत्रात योगदान देणार्या वैज्ञानिक आणि व्यावसायिक गट यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे.
भारत आणि डब्ल्यु एच ओ
भारत 12 जानेवारी 1948 पासून जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य आहे.
तसेच WHO चे दक्षिण -पूर्व आशिया चे क्षेत्रीय कार्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे
WHO ने भारतात देखील महत्वपूर्ण उपक्रम राबवले अनेक साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी भारतात कार्य केले .पोलिओ ची समस्या भारतात मोठ्या प्रमाणात होती हा पोलिओ समूळ नष्ट करण्यासाठी हि संस्था नेहमी कार्यरत राहिली आणि भारतात पोलिओ चे अभियान राबवले याबरोबरच सध्या कोरोना(corona) आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यापासून बचावासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.
हे अतरंगी सुद्धा वाचा
- ६ एप्रिल ला झाली होती दांडी यात्रेची सांगता
- भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल माहित आहे का
- बँकेचे पुढील ३ महिन्याचे EMI स्थगित कसे करावे?
लेख आवडल्यास शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या
असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर