कसे असेल कोरोना नंतरचे जग ? रोग गेल्यावरही जगावर हे राहतील परिणाम.

कोरोना संकटाचे संभाव्य जागतिक परिणाम

-अभिषेक कासोदे

Image result for 2nd world war
rare historical photos

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगच ठप्प झाले आहे. महायुद्धकाळातही दळणवळण न थांबवलेले देश आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या अवस्थेत आहेत. नुकताच ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याने.आता हा रोग सर्वसामान्यांपुरताच सीमित राहिलेला नाही हे निश्चित. अद्याप या रोगावर प्रतिबंधात्मक वा उपचारात्मक कुठलाही ठोस उपाय न सापडल्याने.जग या संकटातून केव्हा बाहेर येईल हे सांगणे कठीण आहे. मात्र याचा तुलनेने कमी मृत्यूदर,तसेच संपूर्ण बरे होण्याचे जास्त प्रमाण बघता.लाॅकडाऊनद्वारे पुढील संसर्ग रोखल्यास हळूहळू याचा प्रकोप घटत जाईल हे खरे. अर्थात हा रोग जरी संपवला तरी त्याचे दूरगामी परिणाम जगावर होणार आहेत. शस्त्रवापर आणि हिंसेशिवायही महायुद्धासारखीच परिस्थिती या जागतिक महामारीने उद्भवली आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या स्वरूपात प्रचंड उलथापालथ झाली. कुचकामी ठरलेल्या लीग ऑफ नेशन्सच्या ऐवजी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) स्थापना.गॅट कराराद्वारे उदारीकरणाची पायाभरणी.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची स्थापना.अमेरिकेचा महासत्ता म्हणून उगम.जगाचा भांडवलवादाकडे झुकाव.वसाहतींना स्वातंत्र्य.ब्रिटनच्या जागतिक वर्चस्वाची पडझड.असे अनेक थेट परिणाम या महायुद्धाने दिले आणि जगाचा चेहरामोहरा बदलला. त्याचप्रमाणे जगाला एखाद्या कैद्याप्रमाणे लाॅकडाऊन करणाऱ्या कोरोना संसर्गाचे पुढील दूरगामी परिणाम जगावर राहण्याची दाट शक्यता आहे.

Image result for wuhan city
ihz.ru

१- चीनबद्दल जागतिक असंतोष-

चीनच्या वुहान प्रांतातून या विषाणूचा संसर्ग सुरू झाला. प्राण्यांमधील हा विषाणू केवळ अपघाताने माणसात आला.असे मानले तरी याचा प्राथमिक स्तरावरच प्रादुर्भाव रोखण्याची राष्ट्रीय जबाबदारी चीनची होती. त्याउलट चीनने या विषाणूसंदर्भात जगाशी बाळगलेली अपारदर्शकता.देशाबाहेर याचा संसर्ग पसरू नये म्हणून घेतलेल्या खबरदारीचा अभाव.जागतिक स्तरावर रोग पसरल्यावर जबाबदारी स्वीकारण्यास केलेली टाळाटाळ.या बाबींमुळे चीनबद्दल जगात असंतोष वाढतो आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या विषाणूचा उल्लेख ‘चायनीज विषाणू’ असाच करत आहेत.

Image result for wuhan city corona
the new york times

जगात अनेक देशांतून चीनच्या हलगर्जीपणाविरुद्ध याचिका दाखल होत आहेत. नुकताच टेक्सास येथील एका वकिलाने करोना विषाणूमुळे जगात झालेल्या नुकसानासाठी चीनला जबाबदार धरत भरपाई म्हणून 20 ट्रिलियन डॉलर्सचा दावा दाखल केलेला आहे. यापूर्वी असाच दावा फ्लोरिडा मधुन दाखल झालेला असून.हा विषाणू म्हणजे ‘चीनने जगाविरुद्ध वापरलेले- वुहान विषाणूशास्त्र संस्थेत तयार केलेले जैविक अस्त्र आहे’ असा बहुतेकांचा आक्षेप आहे. यातील सत्य कालांतराने समोर येईलच पण जगाच्या प्रचंड नाराजीला चीनला आता तोंड द्यावे लागणार आहे. कायदेशीर याचिका, व्यापारी बहिष्कार, आंतरराष्ट्रीय निर्बंध, गुंतवणूकदारांचा रोष अशा गोष्टींचा फटका चीनला बसू शकतो. गेल्या काही वर्षांपासून चाललेले चीन-अमेरिका व्यापारयुध्द आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता दिसते आहे.

Image result for who
stat

2- जागतिक संघटनांचा फेरविचार-

अशा जागतिक महामारीत WHO (जागतिक आरोग्य संघटना) ची जबाबदारी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जगात उद्भवणाऱ्या अशा नवीन आजारांवर लक्ष ठेवणे.त्याबद्दल जगाला सावध करणे.जिथून असा रोग उद्भवतो त्या देशाशी समन्वय साधून जगाला माहिती देणे, ही कामे WHO ची होती. ही करण्यात WHO पुष्कळच कमी पडली असे दिसते. त्याउलट ‘चीन/वुहानमध्ये प्रवास करण्यास कोणताही धोका नाही.असे विषाणू ठराविक काळाने उद्भवतातच. त्याचा माणसाला तितकासा धोका नाही.चीनच्या रिपोर्टनुसार या विषाणूचा माणसाकडून माणसाला संसर्ग झाल्याची नोंद नाही.हे WHO ने जानेवारीमध्ये जगाला दिलेले संदेश आहेत.जे संपूर्ण दिशाभूल करणारे ठरले. त्यामुळे आता चीनसकट WHO च्याही विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहतात. या जागतिक संकटात आंतरराष्ट्रीय समन्वय साधण्यात संयुक्त राष्ट्र आणि तिच्या उपसंस्था यांचीही भूमिका फारशी दिसून आलेली नाही. करोना नंतरच्या काळात या संघटनांच्या उपयुक्ततेचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता दिसते.

Image result for manufacturing in china
wall street journal

3- गुंतवणुकीची दिशा बदलणे-

गेल्या तीन दशकांमध्ये जगाच्या वस्तूनिर्माण क्षेत्राचे केंद्र चीन बनलेले आहे. मात्र जग अगोदरच मंदीच्या खाईत असताना कोरोनासारखे संकट चीनपासून पसरते.आणि जगाची अर्थव्यवस्था ठप्प होते.हे बघून परकीय गुंतवणूकदार पुन्हा चीनमध्ये गुंतवणुकीला सहजासहजी धजावतील असे वाटत नाही. कारण चीन तसेच पूर्व आशियाई भागातून जगभर पसरलेला दोन दशकांतील हा सलग तिसरा विषाणू आहे. तिथे अशा संकटांमुळे जागतिक कंपन्यांना नेहमीच आपले उद्योग बंद ठेवत तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे पाश्चात्त्य गुंतवणूकदारांचा ओघ चीनकडून घटण्याची शक्यता आहे.

Image result for belt and road corridor project china
OBOReurope.com

युरोपने उत्साहाने समर्थन दिलेल्या OBOR (बेल्ट & रोड काॅरिडाॅर).या चीनप्रणित अवाढव्य प्रकल्पांवरही आता प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच मंदीच्या खाईवर उभे असलेल्या जगाला आता दोन महिने ठप्प राहावे लागल्याने.समोर महामंदी आ वासून उभी आहेच.

जागतिकीकरणाबद्दल प्रतिकूलता-

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जग एक खेडे (ग्लोबल व्हिलेज) बनले.देशोदेशींच्या सीमा पुसट झाल्या.आंतरराष्ट्रीय दळणवळण वाढले. मात्र हळूहळू त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले. देशी रोजगारांची कंबरमोड, चीनसारख्या देशांनी परकीय बाजारपेठ काबीज करणे इ.गेल्या काही वर्षांत जगभर उजव्या विचारांच्या संरक्षकवादी नेतृत्वांचा उगम.(उदा. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी)

Image result for trump and modi photos
ft.com

हे जागतिकीकरणाच्या विरोधातलेच लक्षण होते. चीनच्या एका प्रांतातील विषाणूने अवघ्या तीन महिन्यात जगभर फैलावणे.याला अनिर्बंध जागतिकीकरणाचाही हातभार आहेच. त्यामुळे यापुढच्या काळात जगात संरक्षकवादी मानसिकता लोकप्रिय होईल. जागतिकी करणावर सरसकट भरवसा ठेवण्यास जग सहजासहजी धजावणार नाही. चीनसारख्या देशांमध्ये नोकरी/शिक्षणासाठी जाण्याचे काही वर्षे तरी लोक टाळतील.

Image result for bioweapons
interestingengineering.com

जैविक दहशतवादाविरुद्ध यंत्रणा-

कोरोना विषाणुला जैविक अस्त्र (Bioweapon) मानणारा मोठा वर्ग आहे. यातील सत्यता माहीत नसली.तरी जैविक दहशतवादासाठी भविष्यात असा शक्तिशाली विषाणू वापरला गेला तर त्याला तोंड देणारी सक्षम यंत्रणा जगाकडे सज्ज नाही.हे वास्तव आता सिध्द झाले आहे. भविष्यात जगातील प्रमुख देशांच्या पुढाकाराने ही उभारली जाईल अशी अपेक्षा आहे.

Image result for India lal kila
red fort of INDIA
delhi tourism

भारतासाठी अनुकूलता-

जागतिक पातळीवर भारत व चीनला कायमच एकमेकांचे स्पर्धक/पर्याय मानले जाते. चीनबद्दल जगात नाराजी वाढताना भारताने मात्र कोरोनाशी सुरू केलेला सुसज्ज प्रतिकार. सार्कसारख्या पातळीवर पत्करलेले जबाबदार नेतृत्व.याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. कोरोना आपत्तीला आपण कसे हाताळतो.यावर भारताचा आशियातील सर्वात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून दर्जा ठरेल. चीन पासून दूर होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ भारताने यशस्वीपणे आपल्याकडे वळवला.तर ही भारतासाठी चांगली संधी आहे. आंतरराष्ट्रीय मंच (उदा. UN सुरक्षा परिषद) अशा ठिकाणी जबाबदार आशियाई राष्ट्र म्हणून दावा करण्यासाठी भारताला अनुकूल वातावरण तयार होऊ शकेल.

Image result for china president
foreignpolicy.com

चीनचे प्रत्युत्तर-

गेल्या तीन दशकांत चीन अमेरिके पाठोपाठ आर्थिकदृष्ट्या सगळ्यात प्रबळ देश बनलेला आहे. जगाच्या बाजारपेठा चीनने आधीच बळकावलेल्या आहेत. जग आता कोरोनाशी जीवनमरणाची झुंज देत असताना.चीन मात्र या संकटातून आता बर्‍यापैकी बाहेर पडलेला आहे.आणि आर्थिकदृष्ट्याही सावरायला त्याला पुरेसा ज्यादा वेळ मिळालेला आहे. शस्त्रसाठ्यातही चीन प्रबळ आहे.शिवाय UN सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य आहे. त्यामुळे आपल्याविरुध्द घेतल्या जाणार्‍या कारवाईला चीन सहन करणार नाही. तो तितकेच मजबूत प्रत्युत्तर देईल. उद्या जग मंदीच्या खाईत गेले.आणि चीनने तोवर आपली अर्थव्यवस्था सावरली.तर चीन कदाचित आर्थिक महासत्ताही बनू शकतो.

Image result for corona problems
marketwatch.com

यापुढील जागतिक राजकारणातले डावप्रतिडाव यामुळे अतिशय रंजक असणार आहेत. जगावर असे बरेच चांगलेवाईट परिणाम कोरोनोत्तर काळात उमटण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी सध्याच्या संकटातून कमीत कमी नुकसानासह लवकर व जबाबदारीने मुक्त होणे महत्त्वाचे आहे.

सौजन्य- अभिषेक कासोदे

लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्या

अजून नवनवीन लेख वाचण्यासाठी लाईक करा फेसबुक आणि ट्विटर वर

10 thoughts on “कसे असेल कोरोना नंतरचे जग ? रोग गेल्यावरही जगावर हे राहतील परिणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे