charlie chaplin-जगाला हसवणाऱ्या चार्ली च्या चेहऱ्या मागचं दुःख

Charlie Chaplin
pbs

लोकांना हसवणा-या या चेह-यामागे किती दु:खं लपलेलं होतं, हे कदाचितच आपल्याला माहित असेल. आज चार्ली चॅप्लिनचा(charlie chaplin) 128वा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया चार्ली बाबत खास गोष्टी

charlie chaplin

जगात असा एखादा व्यक्ती असेल जो चार्ली चॅप्लिनच्या धमाल अभिनयावर हसला नसेल. चार्ली चॅप्लिनचं नाव निघताच डोळ्यांसमोर विचित्र अंगविक्षेप, चेह-यावरील विचित्र हावभाव अशी विनोदी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. विनोद म्हटलं की, चार्ली चॅप्लिनची आठवण अली नाही, असं होत नाही. बॉलिवूडच्या अनेक विनोदी कलाकारांवर त्याचा प्रभाव बघायला मिळतो. पण लोकांना हसवणा-या या चेह-यामागे किती दु:ख लपलेलं होतं, हे कदाचितच आपल्याला माहित नसेल. आज चार्ली चॅपलिनचा 128वा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया चार्ली बद्दल खास गोष्टी… 

गरीब कुटुंबात जन्मला

The Chaplins | Charlie chaplin, Chaplin, Charles spencer chaplin
pinterest

charlie chaplin – चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 ला लंडनमध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याचं पूर्ण नाव चार्ल स्पेंसर चॅप्लिन असं होतं. त्याची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्याने त्याला वयाच्या नवव्या वर्षापासूनच पोट भरण्यासाठी काम करावं लागलं होतं. चार्लीचे आई-वडिल हे चार्ली लहान असतानाच वेगळे झाले होते. वयाच्या 13 व्या वर्षी चार्लीला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. 

अभिनय क्षेत्रातिल कामगिरी

 Charlie Chaplin The Kid poster
amazon

चार्लीने फार कमी वयातच एक कॉमेडियन म्हणून नाटकात काम करायला सुरु केले . नंतर तो केवळ 19 वर्षांचा असताना त्याला एका अमेरिकन कंपनीने अभिनयासाठी नियुक्त केले आणि ती कंपनी त्याला अमेरिकेला घेऊन गेली. अमेरिकेत जाऊन चार्लीने सिनेमासाठी काम करायला सुरुवात केली आणि मोठा कलाकार म्हणून अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झाला.

चार्ली चा पहिला सिनेमा- charlie chaplin first movie

Charlie Chaplin's first movie
the vintage news

‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा चार्ली चॅप्लिनचा पहिला सिनेमा 1914 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा ‘द किड'(the kid) हा पहिला फुल लेंथ सिनेमा 1921 मध्ये प्रसिद्ध झाला होता. चार्लीने आपल्या आयुष्यात दोन महायुद्धे पाहिली होती. जग जेव्हा युद्धात रक्ताने माकले होते, तेव्हा चार्ली लोकांच्या चेह-यावर हास्य पेरत होता. चार्ली एकदा म्हणाला होतो की, माझं दु:खं कुणाच्यातरी हसण्याचं कारण होऊ शकतं. पण माझं हसणं कुणाच्याही दु:खाचं कारण होऊ नये.

एकही डायलॉग न म्हणता प्रेक्षकांना चार्लीने हसवले

चार्ली ने ‘अ वुमन ऑफ पॅरिस’, ‘द गोल्ड रश’, ‘द सर्कस’, ‘सिटी लाइट्स’, ‘मॉडर्न टाइम्स’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. हे सिनेमे आजही तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. 

वाद आणि चार्ली चॅप्लिन – argument and charlie chaplin

Real Face of Charlie Chaplin
extra extra

आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये चार्ली अनेक वादांमध्ये अडकला होता. 1940 मध्ये आलेल्या ‘द ग्रेट’ हा सिनेमा चांगलाच वादात सापडला होता. कारण त्यात त्याने अॅडॉल्फ हिटलरची भूमिका साकारली होती. नंतर अमेरिकेत त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचे आरोपही लावण्यात आले. त्याची एफबीआयकडून चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर चार्लीने अमेरिका सोडलं आणि तो स्विर्त्झलंडमध्ये जाऊन स्थायिक झाला.

चार्लीचे खाजगी आयुष्य – Charlie’s Personal Life

Charlie Chaplin and his wife, Oona O'Neil Chaplin
pinterest

चार्लीचं खाजगी आयुष्य फारच रंघर्षमय राहिलं आहे. त्याने एकूण 4 लग्ने केली होती. या लग्नातून त्याला 11 अपत्ये झाली. त्याने पहिलं लग्न 1918 मध्ये मिल्ड्रेड हॅरीससोबत केलं होतं. पण हे लग्न केवळ 2 वर्ष टिकलं. त्यानंतर त्याने लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि 1943 मध्ये 18 वर्षाच्या उना ओनीलसोबत लग्न केलं. त्यावेळी चार्ली चॅपलिन 54 वर्षांचा होता. त्याची सर्वच लग्ने वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.

दिग्गज ही होते चार्लीचे चाहते

Gandhi and Charlie Chaplin
scroll

प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन आणि ब्रिटेनची राणी यांच्यासारखे लोक चार्लीचे प्रशंसक होते. तर स्व:ता चार्ली हा महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होते. 

चार्ली चॅप्लिनचा मृतहेद चोरीला-Grave robbers steal Charlie Chaplin’s body

चार्ली चॅप्लिनचा मृत्यू 1977 मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. त्याच्या परीवाराकडू खंडणी मागण्यासाठी हा प्रकार करण्यात आला होता. पण नंतर त्याचा मृतदेह मिळाला आणि पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून 6 फूट कॉंक्रीट खाली त्याचा अंत्यविधी करण्यात आला. 

हे अतरंगी सुद्धा वाचा

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या 

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे