surgical strike-छत्रपती शिवाजी महाराजांनि शाहिस्तेखाना वर केलेली सर्जिकल स्ट्राईक
औरंगजेबाने 1659 मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्षिणेतील सुभेदारी दिली याचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी शाहिस्तेखानला ही जबाबदारी दिली .

पुणे चाकण युद्धानंतर 1661 ते 63 दरम्यान शाहिस्तेखान सतत आपले सैन्य चाल करून पाठवत होता यावर छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) सतत मात करत राहिले .पण यामध्ये स्वराज्याचे मोठे नुकसान ही झाले ,जनता त्रस्त झाली ,साधन संपत्तीचे ही नुकसान झाले म्हणून शिवाजी महाराज शाहिस्ते खानाला वेगळ्या पद्धतीने धडा शिकवण्याचे ठरवतात.
5 एप्रिल 1663 मध्ये सुर्यस्था नंतर महाराज शाहिस्तेखानाच्या ठिकाणावर हल्ला करतात आणि शाहिस्तेखान घाबरून दक्षिण सोडून पळून जातो आजच्या भाषेत ह्याला सर्जिकल स्ट्राईक(surgical strike) म्हटले तरी चालेल.
ही घटना सविस्तर पाहूया

एप्रिल 1663 मध्ये शाहिस्तेखान त्याच पुण्याच्या लाल महालात थांबलेला असतो जिथे महाराजांनी आपले बरेचशे बालपण घालवलेले असते आणि आजूबाजूचा परिसर खानाच्या 1 लाखापेक्षा जास्त सैन्याने व्यापलेला असतो.

5 एप्रिल सुर्यस्था नंतर महाराज पुण्या जवळच असलेल्या सिंहगडावरून आपल्या 400 बहादूर मावळ्यांना घेऊन लाल महालकडे धाव घेतात आणि अंधार पडेपर्यंत तिथे पोहोचतात या वेळी महाराजांचे 2 विश्वासू बाबाजी बापू आणि चिमणाजी बापू ही त्यांच्या सोबत असतात.
जेव्हा मुघल सैनिकांच्या प्रवेश द्वाराजवळ ते पोहोचतात तेव्हा ते पहारेदारांना सांगतात की आम्ही मुघल सैन्याचे दक्षिण विभागाचे सैनिक आहोत आणि या नियुक्तीची माहिती देण्यासाठी आम्ही आत जात आहोत.
तिथे पोहोचल्यानंतर एक कोपऱ्यात काही काळ अराम करून महाराज मध्यरात्री लाल महालकडे पोहोचतात . बालपण तिथे गेल्यामुळे महाराजांना लाल महालातील कोपरा अन कोपरा माहीत असतो .आणि या वेळी रमजान सुरू असतो त्यामुळे खानाचे सैन्य रोजा सोडून गाढ झोपेत असतात आणि जे जागी असतात ऱ्याचा बंदोबस्त मराठा सैन्य शांततेत कुणालाही कळू न देता करतात .
यालाच म्हणतात surgical strike
महाराजांचे सैन्य ज्या खोलीत असतात ती खोली आणि खानाचा शामियाना या दोघांच्या मध्ये एक दरवाजा असतो त्या दरवाजाला विटांनी झाकून बंद केलेला असतो.मराठा सैन्य त्या दरवाजातील एक एक वीट काढायला सुरुवात करतात आणि एक माणूस सहज आत जाईल एवढी जागा त्यात ठेवतात .

सर्वात आधी महाराज आत प्रवेश करतात त्यांच्या मागोमाग 200 सैन्य प्रवेश करतात हळू हळू खान जिथे झोपलाय तिथे शिवाजी महाराज जाऊन पोहोचतात . खानाच्या बायका भीतीने घाबल्यामुळे त्यांनी आधीच खानाला जागे केलेले असते.पण महाराज त्याच्यापर्यंत पोहोचलेले असतात खानाला हे कळताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात महाराज त्याच्यावर वार करतात पण खान स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे करतो आणि यात त्याची बोटे कापली जातात .
त्याच वेळी खानाच्या बायका सर्व दिवे विझवून अंधार करतात यामुळे काही दिसेनासे होते सर्वत्र आरडा ओरड सुरू असते त्या वेळी मराठा सैनिक अंदाधुंद तलवार चालवतात त्याच वेळी बाबाजी बापू बाहेर उभे असलेल्या आपल्या 200 सैन्याला घेऊन सर्व पहारेदारांना मारतात आणि जवळ असलेली वाद्य वाजवायला सुरवात करतात जेणेकरून आरडा ओरड बाहेर च्या सैन्याला ऐकायला जाऊ नये पण महालात एवढा आरडा ओरड आणि आवाज होतो की बाहेर च्या सैन्याला आत काहीतरी होतंय याची चाहूल लागते .
शाहिस्तेखानाने यात मुलगाही गमावला
सर्वात आधी शाहिस्तेखानाचा मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी कोणाचीही वाट न बघता आत येतो आणि मराठा सैन्याला मारायला सुरुवात करतो पण यात त्याचा मृत्यु होतो .जेव्हा शिवाजी महाराजांना कळते की शत्रू सैन्याला समजले आहे तेव्हा महाराज महालातून बाहेर पडतात .तिथून बाहेर जातानाही त्यांना कुणीच अडवत नाही .
मराठी मालिका राजा शिवछत्रपती मध्ये असे दाखवले आहे की महाराज मुघल सैन्याला गाफील ठेवण्यासाठी काही अंतरावर मशाली घेऊन घोडदळ उभे करतात जेणेकरून सर्व मुघल सैन्याचे लक्ष तिकडे मशालींकडे आणि घोड्यांच्या आवाजाकडे असेल आणि मुघल त्यांचा पाठलाग कारतील तेवढ्यात महाराज आणि सैन्य दुसऱ्या रस्त्याने निघून जातात.
surgical strike
हा सर्जिकल स्ट्राईक म्हनजेच हा हमला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे यश होते यात केवळ 6 मावळ्यांनी आपला जीव गमावला आणि 40 मावळे जखमी झाले .याच्या बदल्यात कित्येक मुघल सैनिक आणि शाहिस्तेखानाचा मुलगा देखील मारला गेला.

प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की ह्या हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठा सैन्याने जी चतुराई दाखवली, जे साहस दाखवले त्याचा परिणाम असा झाला की महाराजांची ख्याती आणि सन्मान अजूनच वाढला .अशीही चर्चा झाली की छत्रपती शिवाजी महाराज कुठेही कधीही पोहोचु शकतात त्यांच्यासाठी कुठलेच कार्य अशक्य नाही.संपूर्ण देशात त्यांच्या या पराक्रमाची चर्चा झाली.

हमल्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा जास्वंतसिंग खानाला भेटायला जातो तेव्हा खान त्याला टोम्बना मारतो की “मला वाटले जस्वतसिंग रात्री मला पहारा देताना मारला गेला” खान ला संशय होता की जसवंतसिंह ह्या हमल्यात सहभागी आहे कारण जस्वतसिंग त्या रस्त्यावर आपल्या 10 हजार सैन्याला घेऊन पहारा देत होता जिथून छत्रपती शिवाजी महाराज आले आणि गेले होते.

औरंगजेब ही घटना ऐकून चकित होतो .तो शाहिस्तेखानला डिसेंबर 1663 मध्ये दक्षिणेतून परत बोलावून बंगाल ची जबाबदारी देतो .
हे सुद्धा वाचा
- छत्रपती शिवाजी महाराजांना विषबाधा झाली होती का?
- छत्रपती शाहु महाराजांनमुळे प्लेग कोल्हापुरात येऊ शकला नाही
- भारतातील अनमोल खजिने
लेख आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या
असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर
Pingback: जाणून घ्या हनुमानजींच्या जीवनातील रहस्यमयी गोष्टी .. - अतरंगी क्राऊड