mask-मास्क च्या मागील नाट्य.पहा भारतीय लॉक डाऊन मध्ये स्वतःचे मनोरंजन कसे करतात?

-निनाद नितीन पाठक

The Mask -Entertainment

the mask
youtube

कोरोन्टीन-quarantine च्या काळात एक खूप छान म्हणजे चांगले चांगले सिनेमे जे मिस झाले होते ते पाहायला मिळतायतर… जिम कॅरी चा ” द मास्क “(the mask) नावाचा सिनेमा पाहिला, एक साधा बँकेत काम करणाऱ्या माणसाला लाकडी मास्क(mask) सापडतो आणि ते लावल्यावर पूर्ण शरीर हिरव्या रंगाचं आणि अंगात पिवळा सूट असा लवचिक स्टॅनली(पात्रचं नाव) आणि त्याच्या काही प्रासंगिक विनोदी घटना… पोट धरून हसवतात… ते पाहता पाहता मी खिडकी बाहेर आलो( घरा बाहेर पडलो असतो तर घरी बाबूलाल होऊन आलो असतो म्हणून) आणि काही गोष्टी निदर्शनास आल्या.

Lockdown चे खूपच भीषण परिणाम व्हायला लागलेय. कोरोना(corona) बद्दल खूप महिती मिळायला लागलीय ह्यात सोशल मीडिया चा जास्त हात भार. मला सर्वात जास्त भीती वाटते ती नवीन व्हाट्स अप इन्स्टॉल करणाऱ्यांची. अश्मयुगीन काळातील मेसेजेस ते पाठवतात. सकाळ-दुपार- रात्र जसा औषधांचा टक असतो तसा वेळेनुरूप काही शेर- शायरी किंवा मोठी वेशनल चित्रे यायला लागतात. त्यात आता आलेला ” कोरोना”. त्याच्या बद्दल असलेली सर्व ज्ञात अज्ञात माहिती आपण सर्वात आधी द्यायची त्यांची धडपड. आणि अजून जीव तळमळतो तो व्हाट्स ऍप च्या स्टेटस मुळे.. पण तरीही दर्दी गाणे आणि ते संपे पर्यंत लोकांनी पहावा म्हणून अट्टहास करणाऱ्यांचा नंबर अजूनही पहिला आहे… त्यांनतर बर्थडे विशेष…आणि मग कोरोना बद्दलची भीषण परिस्थिती… सकाळी सकाळी हे पाहून आपल्या लॉक डाउन चा आजचा दिवस आनंदी असेल ह्याची कल्पना येते…

त्यानंतर SEND ME HI & I WILL POST ABOUT YOU वाल्यांचा नंबर…इंस्टा वर तर हागल्या मुतल्याचे चॅलेंज यायला लागलेत. फेसबुक मागे कसं राहील? त्यावर पण काही Evacuation Officer लोकांनी जुने फोटो शोधून त्यावर शीघ्र चारोळ्या सुद्धा सुरू केल्यात.

News Headache

news channel
ongben

बर ह्यातून एखादा माणूस वाचला की तो टीव्ही लावतो… ज्ञानदा तू काय सांगशील? ह्या ओळीने सुरवात होते….सध्या इतर चॅनेल वर जुने भाग प्रसारित होताय तर न्युज(news) हेच साधन म्हणून टीव्ही बघणारे म्हणजे आज तर एका न्यूज चॅनेल वर ” कब कोरोना की कुंडली मे बैठेगा राहू?” हे सदर लागलं होतं.. एक जोतिषाचार्य बोलवण्यात आले होते.. त्यांनी कोरोनाची कुंडली मांडली… आणि ते त्याच विश्लेषण करत होते…बरं कोरोनाची कुंडली पाहून त्याचं लग्न लावतील उद्या. म्हणतील ” कोरोना और नया व्हायरस हंता के बीच पाये गये गेहरे संबंध…जलदी ही हो सकता है उनका मिलाप” वगैरे. “यह मीडिया है यह कुछ भी कर सकती है।” ह्याचा प्रत्यय आला. हे पाहून मोईन अख्तर(moin akhtar) ह्याचे बोल आठवले….

आठवलेच आहे तर आपले लाडके कवी महोदय ह्यांनी जगाला नवीन मंत्र दिला…कोरोना गो… गो कोरोना….(corona go..go..corona) त्यामुळे अक्खा देश कोरोना मुक्त होईलच लवकर.. त्यांनी पण आपला ” quarantine time” स्पेन्ड करताना पूल/ स्नुकर खेळताना चा विडिओ न्युज वाले दाखवत होते..ज्यांना पंकज अडवणीचे कधी विडिओ टाकले पण नसेल असो… मीडिया वाले इथेच थांबत नाही… “ब्रो “च्या पार्श्वभागावर फटके बसल्यावर त्यांनी त्या ” ब्रो” ची मुलाखत पण प्रसारित केली…त्यांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न..फटका बसल्यावरची तुमची प्रतिक्रिया? कसं वाटतंय? आणि एका प्रसिद्ध न्युज चॅनेल वर अक्षरशः अंताक्षरी खेळताना मी ह्याची डोळा पाहिलं… त्या दोन अँकर “……..शुरू करो अंताक्षरी लेकर …” आणि स्वतःच गाणी पण गायली….

न्युज वाले दुसऱ्या महायुद्धात असते तर …असा इयत्ता दहावी च्या मराठी कल्पनाविस्ताराचा एक टॉपिक डोक्यात येऊन गेला. वृत्तपत्राला खूप मिस केलं मी…

ज्ञानाचे पाझर –

mask in corona
navbharat

हा सर्व प्रकार पाहून जनतेवर ह्याचा वेगळाच परिणाम होत आहे.बिल्डिंग मध्ये येणारी भाजीवाले सुद्धा कोरोना आता होणार नाही म्हणून कॉन्फिडेंटली म्हणत होता… मी विचारलं का रे बाबा… तो म्हणाला..’ त्ये आपण टाळ्या, ताटल्या वाजीवल्या ना..त्यामुळे करुना घाबरली… आणि गायप…’ करूनपणे मी त्याला गायछाप मळताना पाहिलं. तो गेल्यावर बिल्डिंगमधल्या 2 घरातील सोशल डिस्टन्स ठेवून बोलणाऱ्या काही बायकांची कुजबुज मला ऐकायला आली. त्यांच्या म्हणण्यानुसार चीन ने मुद्दाम हा व्हायरस आणला… आपण चिनी वस्तू वापरणं बंद केलं म्हणून …आणि त्यावर तीच स्त्री आपली ” मेड इन चायना” लिहलेली भाजीची टोपली घरात ठेवायला म्हणून गेली. त्यांनतर बाकीच्या बायका एकमेकींना कोरोना मुक्ती चे आयुर्वेदिक नुस्के देत होत्या. नुसते देतच नव्हत्या त्या पटवून सांगत होत्या. की घरात चार कोपऱ्यात कपूर ठेवायचा आणि दरवाज्यात एक साजूक तुपाचा दिवा लावायचा. त्यामुळे कोरोना घरात येऊ शकत नाही आणि जरी आला तरी आत कापराच्या वासाने मरून जाईल.

तेवढ्यात मला आईचा आवाज आला घरात भाजी ठेवत असताना आई कसले दिवे बनवताना दिसली आणि मला तिने बाहेर ठेवायला लावले आणि म्हणाली ह्याने कोरोना घरात येणार नाही म्हणून.

Break The Chain –

the mask
NPR

मला व्हाट्सएपला एक मेसेज आला…रात्री कोणीही बाहेर पडू नका… विमानाने औषध फवारणी होणार आहे…. अरे बाबा आमच्याकडं ट्रेन वेळेवर येईना विमान कशाला येणार ? जरी आलं.. तरी आम्ही सगळे लोकं आधी विमान पहायला बाहेर पडू. असं सगळं चाललं असताना 2 – 3 दिवसांपूर्वी मला रात्री 11वाजून 55 मिनिटांनी एक सद्गृहस्थांचा फोन आला… पाणी उकळायला ठेवा आणि त्यात हळद, गूळ आणि चहा पावडर टाका आणि ते गाळून 12 वाजेच्या आत प्या… मी म्हणलं मी करतो हे पण 12 च्या आत नाही होणार… ते म्हणाले की 5 मिन चालतं पण लवकर करा… मला कळालं नाही मी त्यांनी म्हणलं तसं इमानेइतबारे केलं… सकाळी त्यांना कॉल केला आणि त्या मागचा ” राझ” विचारला… त्यावर ते सद्गृहस्थ म्हणले,” अहो आमचे अमुक अमुक नातेवाईक हे तज्ज्ञ आहे त्यांनी हे प्यायला लावलं त्यामुळे कोरोना ची चेन तुटते…

” चेन तुटते…चेन तुटते……. हे शब्द माझ्या कानात गुंजत होते…… आपण देखील एका ” चेन ” चा घटक बनल्याचं कळालं..आणि काल त्याच न्युज चॅनल वर ” हळद गुळाचा चहा फेक” बातमी पाहून त्या चॅनल बद्दल क्षणिक एक विलक्षण आदर निर्माण झाला.

ह्या कोरोनामुळे काही चांगल्या गोष्टी पण होताय.. नवीन विंग्लिश शब्द सर्रास बोलले जाताय( ज्यांचे स्पेलिंग माहिती नसून सुद्धा) जसं… Quarantined, Callous administration, Corona,Lockdown etc etc..

घराचा वैद्य –

sanitizer
jagaran

खेड्या पाड्यात ” सॅनिटाईझर”(sanitizer) बोललं जातंय.. आता ते मिळत नाहीय ते वेगळं.. त्या बद्दल देखील अंधश्रद्धा आहेत. काही लोकं सॅनिटायझर लावून हाथ धुताना मी पाहिलं. तर काही लोकांनी हुशारी वापरून घरच्या घरी होमिओपॅथी च्या स्कीम मध्ये आफ्टर शावर लोशन पाण्यात मिसळून ते हातावर चोळल्याने सॅनिटाईझर चा फील येतो म्हणून करून पण पाहिलं आता त्याच पुढे काय झालं मी विचारलं नाही… नाहीतर नवीन एका स्कीम चा भाग झालो असतो..

Mask-

mask use in village
the new york times

तर हे सर्व एकीकडे चालू असताना काही गोष्टी खरच चांगल्या आहेत.चित्रपट सेलेब्स सुद्धा आपल्या सोशल मीडिया वरून लोकांना घरात बसण्याचे संदेश देत आहेत. कठीण आहे परिस्थिती पण आपण सर्व जण सगळं ठीक करू शकतो.सर्व लोकं जे पुण्यातल्या मुलींना नावं ठेवायचे की काय ते आतंकवादी बनून बाहेर फिरताय (स्कार्फ लावून फिरणाऱ्या मुली ज्यामुळे खरोखरीच गोंधळ होतो .. मी माझ्या मैत्रिणीला ओळखू शकलो नव्हतो वगैरे वगैरे अधिक खुलासा नको) तोंड झाकून फिरताना दिसतात… सर्व लोकं मास्क लावून फिरताय आणि जे लोकांना जज करतात त्यांनी इतर लोकांनी लावलेल्या मास्क(mask) च्या किमतीवर आणि टाईप वर यथेच्छ समाचार घेतला आहेच…. शहरा प्रमाणे खेड्यातील लोक सुद्धा मास्क(mask) वापरायला लागले…आणि लोक हात धुवून कामाला लागले आहे.

घरातले घरपण –

” असंही तू घरात करतेच काय?” अशी ऑफिसातून आलेल्या साहेबांनी आपल्या पत्नी ला मारलेले टोमणे सुद्धा आता कालबाह्य होण्याची चिन्हे आहेत. घरकामाला येणाऱ्या मावशी जेव्हा सुट्टीवर जातात तेव्हा आपल्या आईचे, पत्नीचे, बहिणीचे होणारे हाल लक्षात घेता पुरुष मंडळींनी देखील कम्बर कसून घरकामात हात आजमावत आहेत. त्यामुळे घरातील आणि मनातील जाळे-जळमटे दूर होण्यास मदत होतेय. ” रामायण” , ” महाभारत”, ” व्योमकेश बक्षी” सारखे कार्यक्रम पुनः प्रसारित करून एक वेगळाच आनंद लोकांना झाला.

हवेचे शुद्धीकरण-

पृथ्वी” रि-बूट ” होतेय.. . ह्या लॉक डाउन मुळे वाहनांचा वापर कमी झाला आणि त्यामुळे पृथ्वी मोकळा श्वास घेतेय.SAFAR ( System of Air Quality & Wheather Forecasting & Research) च्या अहवालानुसार तब्बल 90 शहरांमधील शुद्ध हवेची पातळी वाढली. Real time Air Quality Index नुसार दिल्ली मधील प्रदूषित हवेचे प्रमाण 21 मार्च 2020 रोजी 165 ug/m3 होती. आणि ती 30 मार्च 2020 रोजी 64ug/m3 ची नोंद करण्यात आली. सोप्या भाषेत प्रदूषित हवेची पातळी कमी झाली. दिल्ली, मुंबई, पुणे,अहमदाबाद इ. मोठ्या शहरांमध्ये अंदाजे 15 – 30% हवेचे शुद्धीकरण प्रक्रिया होत आहे. हे चित्र अजून सुधारेल. पशु पक्षी ह्या आजारापासून दूर असल्याने सर्व प्राणिमात्र आनंदी आहेत. प्रदूषणाच्या टक्केवारीत कमालीची घसरण पाहायला मिळतेय जणू धरतीने स्वतः साठी quarantine करून घेतलाय.फक्त आपण घरात राहिल्याने हे सर्व होत आहे.

Back to the home

जे जग एकमेकांपासन दूर गेलं होतं ते जवळ यायला लागलंय.. लोकं एकमेकांची काळजी घेताय.. पुणे- मुंबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्व ठिकाणाहून मदत केली जात आहे. घरपोच डबा मिळत आहे..हातावर पोट असणाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येताय. आपल्या गावाकडे पायपीट करून जाणाऱ्यांना लोकं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहेत.पोलिसमित्र , नर्स, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, एस टी कर्मचारी, मेडिकल, किराणा वाले इ .सगळे आपल्या साठी आहेत तत्पर..

मोठ्यांचे ऐकावे-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO) आणि “गुगल-डुडल” ह्यांनी इग्नाझ फिलीप सेमवेईस ह्या ” जगाला हात धुणं” शिकवणाऱ्या एका हंगेरियन चिकित्सक आणि वैज्ञानिकाचे अभिवादन केले . त्यांचे ” अँटिसेप्टिक प्रक्रियेचा प्रारंभिक अग्रणी ” म्हणून वर्णन केले . ह्या माणसाने 1847 मध्ये आपल्याला एक साधी गोष्ट शिकवली जिचं महत्त्व आता कळायला लागलंय. त्यामुळे बाहेरून घरी आल्यावर….हात पाय धू म्हणून ओरडणाऱ्या आईचे महत्त्व पटलं…

तर असे आहे mask चे नाटक

सर्वात महत्त्वाचे, 1 एप्रिल येत आहे तरी अफवांचे मूर्ख बनवण्याचे पेव फुटण्याआधी रोखू या .त्यात भरीस भर म्हणजे पाऊस…12 महिन्यात 6 महिने पडल्यावर सुद्धा ‘ भस्म्या ‘ झाल्यासारखा पडू लागल्याने तरी लोकं घरात थांबतील ही अपेक्षा.ह्या लोक डाऊन मध्ये घरी रहा आणि बोर झाल्यास न्युज चॅनल, व्हाट्स अप आहेच मनोरंजन करायला…

तसं एक करत बातमी वाचली की ,
उत्पादन बंदी मुळे देशभरात कंडोम चा तुटवडा !

-निनाद नितीन पाठक

हे अतरंगी पण वाचा

लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्या

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

7 thoughts on “mask-मास्क च्या मागील नाट्य.पहा भारतीय लॉक डाऊन मध्ये स्वतःचे मनोरंजन कसे करतात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे