पहा तुमचा जिल्हा कुठल्या झोन मध्ये आहे

सध्या भारतात आणि जगात कोरोना व्हायरसने-coronavirus थैमान घातले आहे याची खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन ची मुदत वाढवली आहे.त्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये(corona zone map) विभागणी केली जाणार काहे, पंधरा हुन अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याला किंवा विभागाला म्हणजेच रेड झोनमधील जिल्ह्यांना कोनतीही शिथिलता मिळणार ननसल्याची माहिती मिळत आहे. पंधरा हुन कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या झोन मध्ये असतील असतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हिरव्या झोन मध्ये असतील .या भगव्या आणि हिरव्या झोन मधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून हळू हळू उद्योग आणि व्यवहार सुरळीत करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी दिले आहेत.
India corona zone map
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला.याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले. येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या नियमावली आणि सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणार्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरळीत करण्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग कारखान्यात उद्योग मालक सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले.मुंबई,पुणे,ठाणे पालघरचे लॉकडाऊन-lockdown शिथील होणे कठीण
- नेमाडे नावाचे प्रतिभासंपन्न स्फोटक!
- तेंडुलकरांच्या लेखनश्रेष्ठतेचे स्मरण
- Corona Loan-कोरोना कर्ज काय आहे? कोणत्या बँका देतात?
- लग्नाच्या पहिल्या रात्री ची बंगालमधील विचित्र प्रथा वाचून थक्क व्हाल
- Mahabharat -पितामह भीष्म यांची बाणाची शय्या कशी बनवली होती ?
राज्यातील एकूण कोरोना रूग्णांच्या ९१% रुग्ण हे मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. एकट्या मुंबईत १६५२ पैकी६१% रुग्ण आहेत. पुण्यात २०% टक्के तर १०% रुग्ण हे ठाणे आणि पालघरमध्ये आहेत. फक्त ९% रुग्ण हे राज्याच्या अन्य भागात आहेत. त्यामुळे या भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केंद्राने काही प्रमाणात लॉक डाऊन शिथील केली तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन शिथील होणे कठीण आहे.
Maharashtra corona zone map
ग्रीन झोन
धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
ऑरेंज झोन
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया.
रेड झोन
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
हे सुद्धा महत्वाचे आहे
- भिलवाडा पॅटर्न म्हणजे काय?
- वातावरणात असे काही बदल झाले जे आज पर्यंत कधीही झाले नाही
- बँकेचे पुढील ३ महिन्यांचे EMI कसे स्थगित करावे
- कोरोना संपल्यावर जगावर हे राहतील परिणाम
- जर कोरोना पॉझिटिव्ह थुंकला तर येथे खुनाचा प्रयत्न केल्याचा खटला दाखल होईल
- कोरोनाव्हायरस जैविक शस्त्र तर नाही?
- एप्रिल च्या अखेरीस चीन मध्ये कोरोना पुन्हा हल्ला करेल
- मास्क च्या मागील नाट्य
- अफवांमुळे व्हाट्सअप ने फॉरवर्ड वर निर्बंध लावलेय
- लॉकडाऊन मध्ये आहेत तर हे करा
लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या
असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर
Pingback: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामायणच्या दीपिका चिखलियाचा जुना फोटो तुम्हाला आश्चर्यचकित