Plague-छत्रपती शाहू महाराजांमुळे प्लेग कोल्हापुरात येऊ शकला नाही

सध्या corona-कोरोना ह्या संसर्गजन्य रोगाचे सावट अख्या जगावर आले आहे आणि त्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे.काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण भारतातही आढळायला लागले आहेत.दिवसा गणिक रुग्णांची संख्या वाढत चालली आहे .महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे.

सन 1898-99 साली अशीच प्लेग-plague ची साथ जगात पसरली होती आणि या साथीने अक्षरशः आजच्याप्रमाणेच जगभर थैमान घातले होते . मुंबई शहर आणि महाराष्ट्रात या महाभयंकर प्लेग ने तब्बल 9 लाखांच्या वर लोकांचे प्राण गेले होते पण आश्चर्याची गोष्ट अशी की कोल्हापूर तसेच करवीर प्रांतात या प्लेग ला प्रवेश करता आला नाही याचे श्रेय जाते ते छत्रपती शाहू महाराजांना.

Plague passport to detention — Epidemic Act was a medical ...
the print

ही प्लेग ची साथ अगदी आज जशी कोरोनाची साथ आहे अगदी तशीच होती किंवा त्याहूनही भयंकर म्हटले तरी चालेल .हा प्लेग अतिशय वेगात पसरत होता.महाराष्ट्रात तब्बल 9 लाख लोकांचे बळी या प्लेग ने घेतले होते.यात मुंबई आणि पुणे या शहरात प्रमाण अधिक होते अश्या वेळी मात्र कोल्हापूर या प्लेग पासून सुरक्षित राहिले.याचे कारण छत्रपती शाहू महाराज.त्या वेळी छत्रपती शाहू महाराजांचे राज्यरोहन होऊन काही काळच उलटला होता .जनतेचा विचार करणारा उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी जगाला आदर्श घालून दिला होता.

Why 1-page, 4-section Epidemic Diseases Act of 1897 is wholly ...
the indian express

मुंबईत प्लेग ची साथ येऊ घातलीय हे वृत्त शाहू महाराजांच्या कानावर पडले आणि त्याचक्षणी शाहू महाराजांनी ही प्लेग विरुद्धची मोहीम हाती घेतली .त्यावेळी पूर्ण समाजावर अंधश्रद्धेचा पगडा होता खर तर अश्या वेळी लोकांना समजावणे म्हणजे कठीण काम.पण त्याच वेळी महाराजांनी रायतेसमोर विज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन जागरूकता निर्माण करायला सुरुवात केली .सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण कोल्हापूर रिकामे केले ,या नंतर लोकांना व्यवस्थित आणि खरी माहिती मिळावी यासाठी त्या विषयावर पत्रके छापून ती प्रत्येक गावागावात पोहोचवली.एवढंच नाही तर ज्या लोकांना वाचता येत नाही त्या लोकांसमोर पत्रकाचे वाचन करण्याची व्यवस्था केली.

देशातील पहिले होमिओप्याथी रुग्णालय

प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्लेग-plague या रोगाची करणे आणि काळजी घ्यायची कशी याबद्दल प्रबोधन केले.प्रत्येक गावात व्यवस्थित दवाखान्याची उभारणी महाराजांनी केली आणि संपूर्ण गावेच्या गावे स्वछ केली गेली.एवढ्यावर शाहू महाराजांनी काम थांबवले नाही,या रोगावर काही औषध आणि उपाययोजना आहेत का याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना कळले की होमिओप्याथी मध्ये या प्लेग वर औषध असल्याचं त्यांना समजलं.या नंतर भारतात अशी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे देशातील पहिले होमिओप्याथी रुग्णालय हे कोल्हापुरात सुरू झाले होते .

स्वतः ला Plague ची लस टोचून घेऊन जनतेला हे पटऊन दिले

छत्रपती शाहू महाराजांनी या वेळी प्रजेला पटवून देण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घातले.एवढंच नाही तर स्वतः ला लस टोचून घेऊन जनतेला हे पटऊन दिले यामुळेच अनेक लोकांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेतल्या.या मोहिमेमुळे कोल्हापूर हे या भयंकर प्लेग च्या महामारीपासून वाचले आणि एवढेच नाही तर यामुळे कोल्हापुरात मनुष्यहानी झाली नाही .
छत्रपती शाहू महाराजांचे हे धोरण आजही आदर्श घेण्यासारखे आहे .

हे अतरंगी पण वाचा –कोरोनाची शोकांतिका लवकरच संपेल

लेख आवडल्यास शेअर करा,प्रतिक्रिया द्या

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

error: Alert! चोरी नाही करायची रे