Benefits of Pomegranate – जाणून घ्या डाळिंबाचे गुणधर्म
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप खूप कंटाळा करत असतो . कारण त्याला सोलावे व त्यातील दाणे काढावे लागतात, मग ते शेवटी खायचे. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी(benefits of pomegranate) किती फायदेशीर असते, हे खूप कमी लोकांना माहीत असते. तर चला आपण बघू या या डाळिंबाचे काय काय फायदे आहेत.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
Benefits of Pomegranate – डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे

1.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
2.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
3.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
4.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
5.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
6.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
7.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
- नेमाडे नावाचे प्रतिभासंपन्न स्फोटक!
- तेंडुलकरांच्या लेखनश्रेष्ठतेचे स्मरण
- Corona Loan-कोरोना कर्ज काय आहे? कोणत्या बँका देतात?
- लग्नाच्या पहिल्या रात्री ची बंगालमधील विचित्र प्रथा वाचून थक्क व्हाल
- Mahabharat -पितामह भीष्म यांची बाणाची शय्या कशी बनवली होती ?
8.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
9.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
10.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
11.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
12.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
13.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
14.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
हे सर्व गुणधर्म व फायदे डाळिंबात आहेत तर कंटाळा न करता आपल्या फलहारात त्याचा समावेश नक्की करा.यामुळे आपाल्याला अधिक फायदा होईल.benefits of pomegranate
हे अतरंगी सुद्धा वाचा
- इलायची खाऊन पाणी पिल्याने हे होतील फायदे
- हे आयुर्वेदिक काढे सर्दी आणि खोकल्यात प्रभावी ठरतात
- केळी खाण्याचे फायदे
लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या
असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर