जगातील १५ रहस्यमय गोष्टी ज्यांचे कोडे अजून उलगडले नाही

मानव आज चंद्रावर पोहचला,मंगळावर पोहचला एवढंच नव्हे तर अवकाशात जाऊन इतर ग्रहांचा पण शोध घ्यायला लागला, परंतु आजही मानसाच्या आजूबाजूला काही गूढ गोष्टी आहेत जे आज पर्यंत एक न उलगडलेले कोडं बनलं आहे.चला तर जाणून घेऊया जगातील १५ रहस्यमय गोष्टी ज्या वाचून तुम्ही चकित होणार.

जाणुन घ्या जगातील १५ रहस्यमय गोष्टी

जैक दि रिपर – jack the ripper

Jack the Ripper case जगातील १५ रहस्यमय गोष्टी
the guardian

“जैक दि रिपर” हे नाव तुम्ही बऱ्याच चित्रपटात,नाटकात,मालिकामध्ये तुम्ही ऐकलं असेल,बघितलं असेल. १८ व्या शतकातील ह्या कुख्यात हत्याऱ्याने लंडनच्या पूर्वी भागात ११ महिलांना निर्दयीपणे मारलं होत. ज्यांना मारलं त्या सर्व त्यावेळच्या वैश्याव्यवसाय करणाऱ्या होत्या.हा हत्यारा त्यांचे अश्या प्रकारे तुकडे करायचा की त्यांना कुणीही ओळखू शकत नव्हते.पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की,त्याला कधीच कुणी बघितलं नाही आणि पकडण्यातही आलं नाही.

ताओस हम्म – taos hum

What is the Taos Hum?
live science

न्यू मेक्सिको मधील हे सुंदर व छोटस असणार शहर “ताओस” मुळे चांगलंच प्रसिद्ध आहे.या शहराच्या बाहेर डिझेल इंजिन च्या चालण्याचा आवाज ऐकायला येतो,हा आवाज सर्वांना स्पष्टपणे ऐकायला येतो,पण कुठलेही यंत्र आवाज कुठून येतो याचा शोध घेऊ शकले नाही.या आवाजाला “ताओस हम्म” असे म्हणतात.

बरमुडा ट्रँगल – barmuda triangle

Inside the myths and mysteries of Bermuda Triangle disappearances
business insider

बरमुडा ट्रँगल नावाने ओळखला जाणारा हा भाग बरमुडा,मियामी आणि पोर्तो रिको दरम्यान येतो. या भागातून जाणारे पायलट सांगतात की,येथून बरेच विमान गायब झालेत,त्याच बरोबरच बरेच जहाज सुद्धा समुद्रामध्ये गायब झालेत. बरेच लोक समजतात की हे सर्व एलियन किंवा गॅस प्रेशर मुळे होते,पण यामागील नेमकं कारण अजूनही कुणालाच सापडलं नाही.

वॉयनिश लिपी -voynich manuscript

Has the Voynich Manuscript Really Been Solved?
the atlantic

मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात एवढी प्रगती केली आहे पण या भाषेतील लिपी आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही.आणि जी काही थोडी माहिती भेटते ती त्यावरील चित्रावरून. ही रहस्य उलगडल्यास अनेक बहुमुल्य ज्ञान मनुष्यास मिळेल हे नक्की..

शेफर्ड वास्तूवरील लिखाण – Shepherd’s Monument Inscription

The Shepherd's Monument, Shugborough Hall
pinterest

इंग्लंडमधील स्टेफोर्डशायर मध्ये एक मूर्ती आहे त्यावर केलेले लिखाण आजपर्यंत सर्वात हुशार माणसाला सुद्धा समजले नाही. ही वास्तू १८ व्या शतकामध्ये बनवण्यात आली आणि इथे सापडणाऱ्या चिठ्ठ्या २५० वर्षानंतर सुद्धा कुणालाही वाचता येत नाहीत.

क्रिप्टओस – Kryptos

Kryptos
wikipedia

व्हर्जिनिया मधील लाँगले च्या सि.आय.ए हेडक्वार्टर च्या बाहेर असणाऱ्या कलाकृतीवर कोरलेलं आहे,ही सुंदर कलाकृती जिम सनबॉर्न बनवली होती. याच्या माध्यमातून त्याला सांगायचं होत की प्रत्येक वस्तूला पॅटर्न आणि क्लू च्या माध्यमातून डिकोड केलं जाऊ शकते. यावर चार भागात कोरलेलं आहे,यापैकी तीन भागाची माहिती मिळवली पण चौथ्या भागाची माहिती सी.आय.ए च्या सर्वात हुशार माणसाला सुद्धा मिळविता आली नाही.

पत्र आणि दोरी वापरणार हत्यारा – Zodiac Killer

The Zodiac Ciphers: What We Know
history

१९६०-७० च्या दशकात सॅन फ्रान्सिस्को मधील भागात हा हत्यारा होता,ज्याला पोलीस आणि प्रेस ही दोरी-पत्र हत्यारा म्हणून ओळखत होती.हा पोलिसांना असे पत्र लिहत होता की त्यांच्यावर वेडं होण्याची वेळ येत असे.याने पाठवलेल्या चार पत्रांपैकी एकाच अर्थ लावला ओण बाकी तीन पत्राचा अर्थ अजूनही कुणालाच लावता आला नाही.

तमम शुद –

The Tamam Shud Case – Who Was The Mysterious Somerton Man?
ufo insight

डिसेंबर १९४८ रोजी ऑस्ट्रेलिया मधील एडिलेंड मध्ये येणाऱ्या सोमर्टन समुद्र किनाऱ्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. या व्यक्तीच्या खिशात एक कागद मिळाला त्यावर लिहलं होत “तमम शुद” या शब्दांच अर्थ लावल्यानंतर ओमर खैयाम नुसार “अंत” आणि “खात्मा ” हे शब्द मिळाले. पण या माणसाची ओळख आजपर्यंत जगातही कुणालाच माहिती नाही.

रोंजारोंजो – Rongorongo

Rongorongo
wikipedia

रहस्यमयी ईस्टर द्वीप वर एक नक्षीदार लाकूड आहे याला लोक रोंजारोंजो म्हणतात. या नक्षीदार लाकडावर काय लिहलं आहे हे कुणालाही नाही समजल. असे दोन डझन लाकडावरील सांकेतिक भाषेत लिहलेले संदेश आहेत ज्यामध्ये बहुमुल्य माहिती साठवलेली आहे. परंतु हि कोणालाही डिकोड करता येत नाही आहे.

जॉर्जिया गाईड्स्टोन – georgia guidestones

Georgia Guidestones

अमेरिकेतील प्रति स्टोनएज म्हणून ओळखला जाणारा एलबर्ट काउंटी मध्ये असलेला गाईडस्टोन च्या आजूबाजूला बऱ्याच गूढ कथा गुंतलेल्या आहेत,हे १९७९ मध्ये बनवलं गेलं आहे.या भिंतीवर इंग्रजी, हिंदी,स्वाहिली,हिब्रू,अरबी,चायनीज,रशियन आणि स्पॅनिश भाषेत लिहलं आहे,पाम आजपर्यंत कुणालाही नाही समजलं की हे कशासाठी आणि का इथे लिहलं आहे.

दि लोक नेस मॉनस्टर – loch ness monster

Could the Loch Ness monster be a giant eel?

याच्या विषयीसुद्धा बऱ्याच रहस्यमयी गोष्टी प्रचलित आहेत,काही लोकं म्हणतात की हा एक समुद्री जीव आहे.याचे कितीतरी फोटो आणि विडिओ बनलेले आहेत,ते बघून कुणी म्हणत की हा समुद्री साप किंवा डायनासोर असेल.याला कधी पाण्याच्या वर तर कधी पाण्याच्या आत बघितलं असे लोक म्हणतात.पन ते नेमकं काय आहे हे अजून कुणालाही माहिती नाही.

बिगफूट – Bigfoot

 1970s Bigfoot investigation
abc news

याला लोक सांस्क्वेच नावाने सुद्धा ओळखतात.लोकांच्या म्हणण्यानुसार बिगफूट हा युनायटेड स्टेट आणि कॅनडा च्या हिमाच्छादित भागात आढळला जातो.याला जर बघितलं तर हा सुरून गोरिला आहे असं वाटत,तर याच्या चालण्याच्या पद्धतीवरून लोक याला मानव आहे असं म्हणतात,पण हा प्राणी नेमका कोणता आहे हे कुणालाही माहिती नाही.

स्टोनहेंज – stonehenge

stonehenge जगातील १५ रहस्यमय गोष्टी
artnet news

तस बघितलं तर स्टोनहेंज पाहायला खूप छान आहे,पण आजही कुणालाच माहिती नाही की हे एकमेकांना दगड कसे लावले व यामागील उद्देश काय होता.

अश्वेत दाहलीया ची हत्या – murder of black dahlia

Black Dahlia Elizabeth Short killer
daily mail

ही २२ वर्षीय एलिझाबेथ शॉर्ट च्या दरम्यान शोबिज इंडस्ट्री मध्ये प्रमोशन करण्यात व्यस्त असताना तिची हत्या करण्यात आली पण ही हत्या कुणी केली हे अजूनही न उलघडणार कोडं बनलं आहे.

तुरीन – The Shroud of Turin

The Shroud of Turin was in the Byzantine Empire before 1204 AD
Medievalists

एक असा कापड ज्यावर एका माणसाच्या चेहऱ्याची कलाकृती आहे,आणि हे आजच्या वैज्ञानिकांना शोधण्यासाठी आव्हान बनले आहे.बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की,हा चेहरा नाजरेथ च्या ईसा मासिहा असू शकते.

तर ह्या होत्या जगातील १५ रहस्यमय गोष्टी

हे अतरंगी सुद्धा वाचा

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या 

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे